
अभिनेत्री स्वरा भास्कर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. स्वरा भास्करची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. स्वरा भास्करने फहाद अहमदसोबत लग्न केले.

स्वरा भास्कर हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, फहादसोबत लग्न करणे तिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. ज्यावेळी तिने तिच्या आई वडिलांना फहादसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले, त्यावेळी खूप वाद झाला.

स्वरा म्हणाली, ज्यावेळी मी घरी सांगितले की, मला फहादसोबत लग्न करायचे त्यावेळी माझे आणि आई वडिलांचे भांडणे झाली. मी दुसऱ्या धर्मात लग्न करणार असल्याने ते घाबरले होते.

काही दिवस गेले आणि माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केला. पुढे स्वरा भास्कर म्हणाली की, लग्नाच्या वेळी काही चुकीचा प्रकार होऊ नये, म्हणून फहादने त्याचे 200 कार्यकर्ते आजूबाजुला ठेवले होते.

लग्नाच्या वेळी फहादला खूप जास्त टेन्शन असल्याचे सांगताना देखील स्वरा भास्कर ही दिसत आहे. आता स्वरा भास्करच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.