24 तास बिझी.. तरीही प्रेमात नाही कमी, एकमेकांसाठी कसा वेळ काढतात बॉलिवूड कपल्स ?

आजच्या धावपळीच्या काळात, दिवसभराच्या धावपळीनंतर आणि कामानंतर मुलांची काळजी घेणे लोकांना खूप कठीण होऊन बसते. इतक्या धकाधकीच्या जीवनात, बऱ्याचदा आपण स्वतःसाठी किंवा आपल्या जोडीदारासाठी वेळ काढू शकत नाही. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, 24 तास आणि आठवड्याचे 7 ही दिवस काम करणारे बी-टाऊनमधील हे सेलिब्रिटी त्यांच्या जोडीदारांसोबतचे नाते इतके ताजे कसे ठेवू शकतात. एकमेकांसोबत वेळ घालवता यावा म्हणून ते काय काय करतात, चला जाणून घेऊया.

| Updated on: May 17, 2025 | 1:00 PM
1 / 5
विराट कोहली-अनुष्का शर्मा: विराट आणि अनुष्का हे एक आदर्श जोडपं म्हणून ओळखले जातात. चाहत्यांना त्यांच्यासारखी जोडी हवी असते. दोघेही एकमेकांना त्यांच्या करिअरमध्ये नेहमी सपोर्ट करतात, पाठिशी ठामपणे उभे असतात.  वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करूनही, दोघेही कठीण काळात एकमेकांना कधीही एकटे सोडत नाहीत. हा त्यांच्या मजबूत नात्याचा पाया आहे.

2 / 5
प्रियंका चोप्रा-निक जोनस : प्रियांका आणि निकचे लग्न होतंय हे कळल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.ते दोघेही ज्या क्षेत्रात आहे, तिथे सतत प्रवास करावा लागतो. निक-प्रियांका दोघेही प्रचंड मेहनती आहेत आणि आपल्या कामावर त्यांचं खूप प्रेम आहे. पण त्याच कामातूनही ब्रेक घेत,दोघेही एकमेकांसाठीदेखील बराच वेळ काढतात, आनंदात वेळ घालवतात.

3 / 5
दीपिका पडूकोण आणि रणवीर सिंह : रामलीला फेम कपल दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांची मैत्री. जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा ते एकमेकांशी खूप बोलतात. बोलण्याने विश्वास आणि प्रेम वाढते. दोघेही नेहमी एकमेकांचे फोन उचलतात.

4 / 5
रितेश देशमुख-जेनेलिया डिसुजा : रितेश आणि जेनेलिया हे त्यांच्या चाहत्यांमध्ये सर्वात क्यूट जोडपं म्हणून ओळखले जातात. ते दोघेही एकमेकांबद्दल अपार प्रेम दाखवतातच, पण मैत्री, विश्वास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदरही दाखवतात. रितेश आणि जेनेलिया एकमेकांसोबत मजेदार रील देखील बनवतात आणि त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत.

5 / 5
करीना कपूर-सैफ अली खान: करिना आणि सैफ हे इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. गेल्या वर्षी जेव्हा सैफवर घरात हल्ला झाला तेव्हा करीनाच्या परिस्थितीही कठीण होती. सैफ तिच्यासाठी काय  आहे, किती महत्वाचा आहे, हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. 2012 साली दोघांचेही लग्नं झालं. दोघेही आपापल्या कामात व्यस्त असतात, पण ते एकमेकांसाठी आवर्जून वेळ काढतात. दोघेही एकमेकांना आणि त्यांच्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी एका वेळेस एकाच चित्रपटात काम करतात.