
देशात दोन दशकांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प संध्याकाळी सादर करण्यात येत होता, हे अनेकांच्या गावी पण नसेल. त्यांना याची माहितीच नाही. यावेळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे आपण इंग्रजांची संध्याकाळी अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा जपली.

संध्याकाळी 5 वाजता बजेट सादर करण्याची परंपरा वर्ष 2001 मधील एनडीए सरकारने सुरु केली. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला आणि इंग्रजांची परंपरा मोडीत काढली.

संध्याकाळी बजेट सादर करण्यामागे एक कारण होते. इंग्रज राजवटीत ब्रिटेनमध्ये सकाळी 11 वाजता बजेट सादर करण्यात येत होते. त्यात भारताच्या अर्थसंकल्पाचा पण भाग होता. तर संध्याकाळी त्याचवेळी भारतीय संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता. ही परंपरा स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे कायम होती.

राष्ट्रीय लोकशाही आघडी सरकारच्या कार्यकाळात या पंरपरेला फाटा देण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी 2001 मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता केली. बजेट सादर केले.

त्यानंतर पुन्हा एनडीए सरकार सत्तेत आले. त्यावेळी मोठा बदल झाला. मोदी सरकारने 28 फेब्रुवारी रोजी सादर होणारे बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा प्रघात सुरु केला.

स्वतंत्र रेल्वे बजेट बंद करण्यात आले. रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर करण्याची पंरपरा संपुष्टात आणण्याची सूचना तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली होती.