कॅमेरा, डान्स आणि एका टेकचा खेळ; फराह खानने सेटवर केलेला ‘हा’ प्रयोग माहितीये का?

'मैं हूं ना' चित्रपटातील 'चले जैसे हवाएं' हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मात्र, या गाण्याचं शूटिंग करताना फराह खानने एक खास प्रयत्न केला होता, जो अनेकांना माहितीच नाही, चला तर मग जाणून घेऊयात...

| Updated on: Nov 19, 2026 | 11:54 PM
1 / 5
2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैं हूं ना' या चित्रपटातील 'चले जैसे हवाएं' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या   गाण्याचं व चित्रपटाचं दिग्दर्शन फराह खानने केलं होतं.

2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैं हूं ना' या चित्रपटातील 'चले जैसे हवाएं' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या गाण्याचं व चित्रपटाचं दिग्दर्शन फराह खानने केलं होतं.

2 / 5

या गाण्यातील बहुतांश सीन्स एकाच टेकमध्ये चित्रित करण्याचा फराह खानचा प्रयत्न होता. त्यामुळे हे गाणं इतर गाण्यांपेक्षा वेगळं ठरलं.

3 / 5

या गाण्याच्या शूटिंगपूर्वी कलाकार आणि डान्सर्सनी मुंबईत सलग 4 दिवस रिहर्सल केली होती. दररोज शूटिंग संपल्यानंतर एक ते दोन तास कॅमेऱ्यासह सराव केला जात होता.

4 / 5

शाहरुख खानचं शूटिंग संपल्यानंतर या गाण्याचं चित्रिकरण करण्यात आलं. एका टेकमध्ये जवळपास 2.5 ते 3 मिनिटांचा सीक्वेन्स चित्रित करण्यात आला होता.

5 / 5

या गाण्यात अमृता रावचा भाग तीन टेकमध्ये पूर्ण झाला. मात्र, ढगांमुळे प्रकाश कमी होणं आणि कॅमेरा योग्य ठिकाणी वेळेत न पोहोचणं अशा अडचणींमुळे काही टेक पुन्हा घ्यावे लागले. संपूर्ण गाण्याचं शूटिंग दीड दिवसात पूर्ण झालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us