समोर मित्र पण पाठीमागे खरा शत्रू, असे लोक तुमचा करतात घात; चाणक्य नीतीच्या या संदेशाकडे नका करू दुर्लक्ष!
आचार्य चाणक्य यांनी तुमचा मित्र हा खरंच तुमचा मित्र आहे की शत्रू हे कसे ओळखावे याबाबत काही महत्त्वाचे संकेत सांगितले आहेत.

आचार्य चाणक्य यांनी तुमचा मित्र हा खरंच तुमचा मित्र आहे की शत्रू हे कसे ओळखावे याबाबत काही महत्त्वाचे संकेत सांगितले आहेत. हे संकेत नेमके काय आहेत? चाणक्य नीती नेमकं काय सांगते? ते जाणून घेऊ या...

तुमचा मित्र अगोदर तुमच्याशी खुलेपणाने व्यवहार करत असेल. मोकळेपणाने बोलत असेल आणि त्याच मित्राचे तुमच्यासोबतचे वागणे बदलले तर संबंधित व्यक्ती तुमच्या मैत्रीच्या लायकीची नाही, असे समजावे. अशा व्यक्तीपासून दोन हात दूर राहावे.

तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश मिळाले तर तुमचा निस्वार्थ मित्र खूप आनंदी दिसतो. त्याला उलट आपणच जिंकल्यासारखे वाटते. परंतु स्वार्थी मित्राला तुमचे यश खपत नाही. तुम्ही यशस्वी झाले की त्याला मात्र दु:ख होते. अशा मित्रांपासून दूर राहावे.

तुमचा खरा मित्र कधीच तुमची साथ सोडत नाही. चांगल्या, वाईट काळात तो तुमच्यासोबत असतो. विशेष म्हणजे तुमचे मत मोडून-तोडून दुसऱ्यांना सांगत नाही. परंतु तुम्ही ज्याला तुमचा मित्र मानत आहात आणि तो तुमच्या मतांची मोडतोड करून वेगळंच काहीतरी सांगत असेल तर अशा व्यक्तीपासून सावध राहावे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.