AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs CSK Live Streaming : चेन्नईसाठी निर्णायक सामना, लखनौ यलो आर्मीचा हिशोब चुकता करणार?

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings IPL 2026 Live Scorecard: लखनौ सुपर जायंट्ससाठी आयपीएल 2026 स्पर्धा संपलीय. मात्र चेन्नईचा प्लेऑफसाठी संघर्ष सुरुय. त्यामुळे चेन्नईसाठी लखनौ विरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

LSG vs CSK Live Streaming : चेन्नईसाठी निर्णायक सामना, लखनौ यलो आर्मीचा हिशोब चुकता करणार?
LSG vs CSK IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 15, 2026 | 9:08 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) प्लेऑफसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या हंगामात 58 सामन्यानंतरही एकही संघ अधिकृतपणे प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. एकूण 2 संघांचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे 4 जागांसाठी 8 संघांमध्ये चुरस आहे. शुक्रवारी 19 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी 1 असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना होणार आहे. चेन्नईसमोर लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान असणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची सलग आणि एकूण दुसरी वेळ ठरणार आहे.

चेन्नई आणि लखनौ दुसऱ्यांदा आमनेसामने

चेन्नई विरुद्ध लखनौ दोन्ही संघ याआधी 10 मे रोजी आमनेसामने आले होते. तेव्हा चेन्नईने पंजाबवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. लखनौचं या पराभवासह 19 व्या मोसमातील आव्हान संपुष्ठात आलं होतं. मात्र चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. मात्र चेन्नईला प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे चेन्नई सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकणार की लखनौ 15 मे रोजी यलो आर्मीचा हिशोब चुकता करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कधी?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना शुक्रवारी 15 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना एकाना स्टेडियम, लखनौमध्ये होणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहता येईल.

लखनौ-चेन्नईत दोघांमध्ये टफ फाईट

दरम्यान लखनौ विरुद्ध चेन्नई यांच्यात एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. दोघांनी प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता शुक्रवारी कोणता संघ चौथा सामना जिंकून आघाडी मिळवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ