AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : पंजाबचं सलग 5 पराभवामुळे प्लेऑफचं गणित बिघडलं, आता असंय समीकरण

IPL 2026 Points Table : मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा धुव्वा उडवत प्लेऑफचं समीकरण बिघडवलं आहे. पंजाब किंग्सला सलग 5 पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहचण्याची किती संधी? जाणून घ्या समीकरण.

IPL 2026 Points Table : पंजाबचं सलग 5 पराभवामुळे प्लेऑफचं गणित बिघडलं, आता असंय समीकरण
Punjab Kings Shreyas IyerImage Credit source: Bcci
| Updated on: May 15, 2026 | 8:06 AM
Share

जसप्रीत बुमराह याने त्याच्या नेतृत्वातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स टीमला आयपीएल 2026 स्पर्धेत विजय मिळवून दिला. मुंबईने आयपीएलच्या 19 व्या मोसमात पंजाबचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. पंजाबने मुंबईसमोर 201 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान सुरक्षितपणे पूर्ण करत एकूण चौथा तर पंजाब विरुद्ध पहिला विजय ठरला. तर पंजाबने पराभवाचा पंच लगावला. पंजाबचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला. यामुळे पंजाबचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं आहे. पंजाब विरुद्ध मुंबई सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमधील स्थिती कशी आहे? तसेच पंजाबला प्लेऑफसाठी किती सामने जिंकावे लागणार? हे जाणून घेऊयात.

पंजाबची 19 व्या मोसमात अप्रतिम सुरुवात झाली होती. पंजाब 7 सामन्यानंतर अजिंक्य राहणारी स्पर्धेच्या इतिहासातील पहिली टीम ठरली होती. पंजाबने पहिल्या 7 पैकी 6 सामने जिंकले होते. तर एकमेव सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 13 गुण होते. प्लेऑफसाठी किमान 16 गुण लागतात. त्यामुळे पंजाब उर्वरित 3 गुण सहज मिळवून प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरेल, असं चित्र होतं. मात्र त्यानंतर सर्व उलट झालं.

पंजाब किंग्सच्या पराभवाचा पंच

सलग 7 सामन्यानंतर अजिंक्य राहणाऱ्या लखनौच्या अडचणीत वाढ झाली. मुंबईने पराभूत केल्यानंतर लखनौची सामना गमावण्याची सलग पाचवी वेळ ठरली. तर मुंबईने पंजाबवर मात करत एकूण चौथा सामना जिंकला. मात्र त्यानंतरही पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पॉइंट्स टेबलचं चित्र या सामन्याआधी होतं तसंच कायम आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण नंबर 1?

पंजाबचं समीकरण बिघडलं

मुंबईचं या मोसमातून बाहेर झालीय. त्यामुळे मुंबईला आता तसा काही फरक पडत नाही. मात्र मुंबई विरुद्ध पराभव झाल्याने पंजाबच्या अडचणीत वाढ झालीय. पंजाब किंग्स टीमच्या खात्यात आता 12 सामन्यानंतर 5 पराभव आणि 6 विजयांसह एकूण 13 गुण आहेत. पंजाबचे आता 2 सामने बाकी आहेत. पंजाबसमोर या उर्वरित 2 सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान असणार आहेत. आरसीबीही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. तसेच लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान संपुष्ठात आलंय. मात्र लखनौ पंजाबच्या अडचणीत वाढ करु शकते. त्यामुळे पंजाबचा उर्वरित 2 सामन्यांत प्लेऑफसाठी चांगलाच कस लागणार आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ