Chanakya Niti: अशा लोकांना घराकडं फिरकूही देऊ नका, चाणक्याचा काय सल्ला?

Chanakya Niti: रोज समाजात वावरताना अनेक लोकांशी आपला संपर्क येतो. त्यातील काहींशी केलेली मैत्री आपल्याला मनस्ताप देऊन जाते. याविषयी आचार्य चाणक्य यांनी मोठा सल्ला दिला आहे. काय आहे त्यांचा हा मंत्र?

| Updated on: Mar 14, 2026 | 4:00 PM
1 / 6
चाणक्य नीतीवर समाजात नेहमी चर्चा होते. नातेसंबंध, जीवनशैली, आपले मित्र यावर आचार्य चाणक्यांनी कटाक्ष टाकला आहे. त्यांनी यावर चांगले भाष्य केले आहे. आपल्या आयुष्यात कधीही वाईट लोक येऊ देऊ नका, त्यांना ओळखायचं शिका असे चाणक्य सांगतात.

चाणक्य नीतीवर समाजात नेहमी चर्चा होते. नातेसंबंध, जीवनशैली, आपले मित्र यावर आचार्य चाणक्यांनी कटाक्ष टाकला आहे. त्यांनी यावर चांगले भाष्य केले आहे. आपल्या आयुष्यात कधीही वाईट लोक येऊ देऊ नका, त्यांना ओळखायचं शिका असे चाणक्य सांगतात.

2 / 6

लोक ओळखण्याची किमया साधता येणे आवश्यक असल्याचे चाणक्य नीती सांगते. चाणक्य नीतीनुसार वाईट, लबाड, धूर्त आणि नकारात्मक लोकांपासून चार हात दूर राहणे अत्यावश्यक आहे. अशा लोकांना कधीच तुमच्या घरात घेऊ नका, त्यांना घरी येण्याची संधी देऊ नका.

3 / 6

जेव्हा असे धूर्त, लबाड लोक तुमच्या आयुष्यात येतात, तेव्हा ते तुमच्याकडून काही तरी काढून घेण्याचा, गैरफायदा घेण्याचा, तुमच्या नावाचा गैर वापर करण्याचा प्रयत्न करतात. सलगी दाखवून ते तुमच्या नावाचा गैरवापर करू शकतात. तुम्हाला फसवू शकतात.

4 / 6

मुंह में राम और बगल में छुरी अशा लोकांना जवळपासही फटकू न देण्याचा सल्ला चाणक्य देतात. ही लोक तुमच्या तोंडावर स्तुती करतात पण तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात. अशा लोकांनी घरी बोलावल्यास ते नात्यात दुरावा निर्माण करण्याचे काम करू शकतात.

5 / 6

तर काही लोक तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेत तुम्हाला अडचणीत आणतात. घरात भांडणं लावण्याचे काम करतात. तुम्ही त्रासलेले पाहून त्यांना आनंद होतो. अशा कळलाव्यांना घरी येण्याचं कधीच आमंत्रण देऊ नका असा सल्ला चाणक्यांनी दिला आहे. गोड बोलणाऱ्या लोकांपासून चाणक्यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

6 / 6

डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून माहिती घेतली आहे. टीव्ही ९ मराठी या माहितीची पुष्टी करत नाही.माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचावी हा यामागील उद्देश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us