Chanakya Niti : नातेवाईकांपासून लपवा या 11 गोष्टी, पाहा कोणत्या ?

आचार्य चाणक्य यांनी केवळ राजकीय वा प्रशासकीय बाबीच नाहीत. तर जीवनाच्या प्रत्येक पैलूंबाबत मार्गदर्शन केलेले आहे. आजच्या काळात नात्यातील गैरसमज, मत्सर, तुलना सामान्य झाली आहे. अशात चाणक्य निती आपल्याला सांगते की प्रत्येक गोष्ट खरी सांगणे समजदारी नाही. काही बाबी खाजगी चुकीच्या लोकांकडे गेल्या तर सहकार्या ऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे आत्मसन्मान, मानसिक शांती आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी काही सीमा निश्चित करणे गरजेचे असते.

| Updated on: Dec 28, 2025 | 10:06 PM
1 / 11
कौटुंबिक भांडणे (Family Conflicts) - घरातील वाद आणि भांडणे इतर नातेवाईकांना सांगत बसू नका. या गोष्टी लोक नेहमीच गॉसिप बनून पसरवतात आणि समस्या आणखीनच वाढते.

2 / 11
मानसिक वेदना (Mental Pain) - आपल्या मानसिक दु:ख आणि वेदना कोणा नातलगाला सांगत बसू नका. प्रत्येक जण सुहानुभूती व्यक्त करेलच असे नाही. काही जण याचा हत्यार म्हणूनही वापर करु शकतात.

3 / 11
खरे प्रेम (True Love) - नातेवाईकांचे नाक खुपसणे नात्यात संशय आणि अंतर आणू शकते. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रेमाला जगाच्या नजरेपासून वाचवा. कोणालाही काही सांगू नका त्यामुळे तुम्ही सुरक्षित रहाल.

4 / 11
आपले उत्पन्न (Income) - आपले उत्पन्न नातेवाईकांना सांगितल्याने मत्सर, तुलना आणि नको असलेला दबाव वाढतो. त्यामुळे जितके कमी लोक तुमचे उत्पन्न जाणतील तेवढे तुमचे जीवन सुरक्षित होते.

5 / 11
जुना संघर्ष (Past Struggles) - कोणताही जुना संघर्ष, जुना अपमान, किंवा इतर भूतकाळातील कोणत्याही गोष्टी कोणाला सांगत बसू नका. कारण लोक तुमची मेहनत नाही तर तुमच्या कमजोरी लक्षात ठेवतात.

6 / 11
आपल्या भविष्यातील योजना (Life Plans) - आपल्या भविष्यातील योजनांचा बोभाटा करु नका. कारण तुमचे शत्रू सावध होतात आणि त्यात आडकाठी आणू शकतात.अपूर्ण स्वप्नांवर नकारात्मकता आणि संकटं लवकर येतात.

7 / 11
दूसऱ्यांशी तुलना - दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवा. त्यामुळे तुमची छबी आणि आत्मविश्वास दोन्हींना नुकसान पोहचू शकते.

8 / 11
 दान आणि उदारता -  कोणतेही दान शुद्ध तेव्हाच असते जेव्हा ते गुप्तपणे केलेले असते. सांगून केलेले दान फळत नाही. त्यामुळे तुमचे दान कोणाला सांगू नका.

9 / 11
तुमच्या कमजोरी - तुमच्या कमजोरी कोणालाही सांगत बसू नका. जर शत्रूला तुमची कमजोरी कळली तर त्याला तुमच्यावर वार करायला तलवारीची गरज लागणार नाही.

10 / 11
वाईट सवयी आणि  उणिवा - तुमच्या वाईट सवयी आणि उणिवा जर तुम्ही मोकळेपणाने कोणाला सांगातल्या तर तुम्ही त्यांच्यात थट्टेचा विषय ठराल. त्यामुळे तुमची बदनामी देखील होऊ शकते.

11 / 11
अपूर्ण स्वप्नं - तुमच्या अपूर्ण स्वप्नांची माहिती सगळ्यांना देऊ नका. लोक तुमची थट्टा करुन तुमची प्रेरणा संपवू शकतात. त्यामुळे अपूर्ण स्वप्नांचाही उल्लेख कोणासमोर करु नका.