‘छावा’ फेम अभिनेता लवकरच बनणार बाबा; चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’

'छावा' फेम अभिनेता विनीत कुमार सिंहच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत त्याने याबद्दलची माहिती दिली. विनीतची पत्नी रुचिरा गरोदर असून जुलै महिन्यात बाळाचा जन्म होणार आहे.

| Updated on: May 02, 2025 | 12:08 PM
1 / 7
विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटात छंदोगामात्य ऊर्फ कविकलश यांची दमदार भूमिका साकारलेला अभिनेता विनीत कुमार सिंह लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे.

2 / 7
विनीतने पत्नीसोबत खास फोटो पोस्ट करत लिहिलं, 'नवीन आयुष्य आणि आशीर्वाद. बाळ लवकरच येणार आहे. चिमुकल्याला बाळाला नमस्ते. आम्ही तुझं स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत.'

3 / 7
याविषयी 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना विनीत म्हणाला, "आयुष्यातील हा टप्पा आम्हा दोघांसाठी खूपच खास आहे. आम्ही खूप खुश आहोत आणि बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. प्रत्येक गोष्ट आता नवीन वाटू लागली आहे आणि मला प्रत्येक क्षणाचा साक्षीदार व्हायचंय."

4 / 7
"मी पत्नी रुचिराची काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. मी लवकरात लवकर काम आटपून घरी पळतो. तिच्यासोबत डॉक्टरांकडे जाता यावं यासाठी मी माझं शेड्युल ठरवलंय. जुलैमध्ये बाळाच्या जन्मानंतर मी पितृत्व रजेवर जायचा विचार करतोय", असंही त्याने सांगितलं.

5 / 7
विनीतने 2002 मध्ये संजय दत्तच्या 'पिता' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुरुवातील त्याच्या कामाला फारशी ओळख मिळाली नाही. नंतर अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील भूमिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.

6 / 7
2018 मध्ये अनुरागच्याच 'मुक्काबाज'मध्ये विनीतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनदेखील मिळालं होतं.

7 / 7
गेल्या काही महिन्यांपासून विनीत 'छावा' या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला आहे. विकी कौशलच्या या चित्रपटात त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.