
मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच दिल्लीला गेलेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे . या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. शहा यांच्या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेनंतर त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत केंद्र सरकार नक्कीच करेल असे मला आश्वस्त केल्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषाला अभिनवादन केले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांस पुष्प अर्पण करित अभिवादन केले.

मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सदनाच्या परिसरात स्थित महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.

दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी यांची आज सदिच्छा भेट घेतली. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या या भेटीत त्यांना विठुराया आणि रखुमाईची प्रतिमा भेट म्हणून दिली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस हेदेखील सोबत उपस्थित होते.