
तंत्रज्ञानाच्या आधारावर चीनने बरीच प्रगती केली आहे. या देशाने अमेरिकेलाही चकित करणारे अविष्कार सत्यात उतरवले आहेत. सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाहिलेले स्वप्न आता चीनने सत्यात उतरवले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक गोल्डन डोम तयार करण्याचे स्वप्न पाहिले होते. या गोल्डन डोमच्या आधारे जगातील कोणत्याही कोपऱ्यातून एखादे क्षेपणास्त्र डागले तर त्याला ट्रॅक करून नष्ट करणारे तंत्र विकसित करण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. अमेरिका ही यंत्रणा विकसित करण्याचे स्वप्नच पाहात आहे. इकडे चीनने मात्र हे तंत्र विकसित केले आहे.

अमेरिकेच्या तसेच जगाच्या रक्षणासाठी अशी एक यंत्रणा असावी, असे डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न आहे. इकडे चीनने मात्र हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. चीनने आपल्या या गोल्डन डोमला 'बिग डेटा प्लॅटफॉर्म' असे नाव दिले असून हे एक जागतिक क्षेपणास्त्र संरक्षण नेटवर्कचे प्रोटोटाईप आहे. चीनच्या लिबरेशन आर्मीने कोणतीही परवानगी न मिळवता तसेच या प्रोटोटाईपच्या पूर्णत्त्वाची वाट न पाहता या बिग डेटा प्लॅटपॉर्मला कार्यान्वितही केले आहे.

चीनची प्रमुख संरक्षण संशोधन संस्था असलेल्या नानजिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमधील ली जुदोंग यांच्या टीमने हे तंत्र विकसित केले आहे. या तंत्रानुसार पृथ्वीवरच्या कोणत्याही भागातून चीनवर एखादे क्षेपणास्त्र डागले तर ते ट्रॅक करता येते.

विशेष म्हणजे हे तंत्र एकाच वेळी 1000 क्षेपणास्त्र ट्रॅक करू शकते, असे सांगितले जात आहे. अंतराळ, समुद्र, हवा, जमिनीवर पसरलेल्या सेन्सर्सच्या आधारे चीनवरील धोके शोधून त्याचे विश्लेषण करते.