
"यो यो मुंबईचा पावणा आलाय कोलीवाऱ्यान, दाढी मिशी करून यो बगतोय तोऱ्यान....." असे धमाल शब्द असलेला मुंबईचा नवरा हा नवा म्युझिक व्हिडीओ खास गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आशय कुलकर्णी आणि सिद्धी तुरे ही नवी जोडी या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली आहे.

आशय कुलकर्णी हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. "माझा होशील ना", "किती सांगायचंय मला", "पाहिले न मी तुला" अशा मालिकांतून आशयनं प्रेक्षक पसंती मिळवली आहे.

तर सिद्धी तुरेनं आतापर्यंत काही म्युझिक व्हिडिओ केले असून सिद्धीनंच हे धमाल गाणं गायलं आहे. सिध्दीने गायलेली कोळी गाणी खुप लोकप्रिय आहेत त्यातील सप्तसूर म्युझिकने प्रदर्शित केलेलं "वसईच्या नाक्यावर येशील का..." हे गाणे रसिकांना आवडले आहे. त्यांच्यासह रितू मापारेही यात असून अंकित शिंदे आणि दिव्या घाग कार्यकारी निर्माते आहेत.

सप्तसूर म्युझिकनं गेल्या काही काळात सातत्यानं नव्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. त्यातून नवे गीतकार, संगीतकार, कलावंतासाठी मोठा मंच उपलब्ध झाला आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर्समध्येही वाढ होत आहे. कोळी-आगरी बोलीभाषा, धमाल गीत-संगीत, आशय आणि सिद्धीची फ्रेश जोडी, उत्तम छायांकन या सगळ्यामुळे म्युझिक व्हिडिओ प्रेक्षणीय झाला आहे. खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणारा "मुंबईचा नवरा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवेल.