
अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि तिचा पती प्रतिक शाह... हृता आणि प्रतिक दोघे परदेश ट्रिपला जात असतात. या ट्रिपमधील काही खास फोटो त्यांनी शेअर केलेत.

1000 जागांवर मी माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत गेलो आहे. खूप सुंदर संध्याकाळ ही अशी कॅमेऱ्यात कैद केली, असं म्हणत प्रतिकने खास फोटो शेअर केलेत.

हृता आणि प्रतिकच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. अनेकांना लाईक आणि कमेंट करत या दोघांच्या फोटोंना पसंती दिलीय.

तू किती क्यूट आहेस... तू माझी क्रश आहेस. असे पतीसोहतचे फोटो टाकून किती हृदयं तोडणार आहेस? अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

हृता 'फुलपाखरू' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली. तर प्रतिक हा दिग्दर्शक आहे. या दोघांनी नुकतंच आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.