
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांना वेड लावते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.

चाहत्यांनासुद्धा फातिमाचे फोटो आवडतात. फातिमा सना शेखनं नुकतंच शेअर केलेल्या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या अभिनेत्रीने तिचे काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत, हे पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.

फातिमानं तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती जबरदस्त आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत आहे.

तिनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती आपल्या स्टाईलने पाण्यात आग लावताना दिसत आहे. हे फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहेत.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘दंगल’ या सुपरहिट चित्रपटामध्ये आमिर खान आणि सान्या मल्होत्रासोबत काम केल्यानंतर ही अभिनेत्री सर्वांच्या नजरेत आली.

नुकतंच फातिमा सना शेख 'अजीब दास्तान' आणि शॉर्ट फिल्म 'मजनू' मध्ये दिसली होती.