
अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिची फार लहान भूमिका होती. पण त्याच भूमिकेमुळे तृप्ती हिला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली...

आता तृप्तीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे.

तृप्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. ‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला होता.

आता अभिनेत्री लवकच 'बॅड न्यूज' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्रीसोबत विकी जैन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

विकी कौशल, तृप्ती डिमरी स्टारर सिनेमा 19 जुलै 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा पोस्टर देखील प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या सिनेमाची चर्चा आहे.