
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही सध्या सोशल मीडियावर सध्या खूप ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अंकिताने नुकतेच सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.

रंगेबिरंगी ड्रेस परिधान करत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. सोशल मीडियावर हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.

अंकिताला खरी ओळख मिळाली ती म्हणजे झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेतील अर्चनाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अंकिता ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये ‘अर्चना’च्या भूमिकेत दिसली आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतूनच तिला भरपूर लोकप्रियता मिळाली होती. पहिल्या सीझनमध्ये अंकिता आणि सुशांत सिंह राजपूतच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले.

अंकिता लोखंडेची स्टाईल लोकांना आवडत आहे. गार्डनमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.