
'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच गंमतीजमती होत असतात. टास्क, वाद, भांडणासोबत सदस्य एकमेकांसोबत मजा-मस्ती करताना अनेकदा दिसून येतात. असाच एक टास्ट रंगणार आहे.

आजच्या भागात साध्या चिप्ससाठी अरबाज वर्षा उसगांवकर यांना मस्का लावताना दिसणार आहे. अरबाज आणि वर्षा उसगांवकरांची मजा-मस्ती पाहताना प्रेक्षकांना मात्र मजा येत आहे. बिग बॉस मराठीच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये वर्षा त्यांचा ठसका दाखवताना दिसत आहेत.

दुसरीकडे अरबाज मात्र त्यांना भरपूर मस्का लावतोय. प्रोमोमध्ये वर्षा चिप्स खास आहेत. तर अरबाज चिप्ससाठी त्यांच्या मागे लागलेला दिसत आहे. त्यावर वर्षा उसगांवकर अरबाजला मस्का लावण्यासाठी सांगत आहेत.

वर्षा उसगांवकर अरबाजला म्हणत आहेत,"मी जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती आहे असं म्हण!". त्यावर अरबाज त्यांना उत्तर देतो. सगळ्यात सुंदर स्त्री आहात तुम्ही...., असं अरबाज म्हणतो. त्यानंतर वर्षा अरबाजला आणखी मिश्किल बोलतात.

पुढे वर्षा उसगांवकर त्याला आणखी त्यांची बाजू घ्यायला सांगतात. निक्की आणि मी भांडत असताना नेहमी मी तुमची बाजू घेणार असं म्हण, असं वर्षा म्हणताता. त्यावर अरबाज फनी उत्तर देतो. नेहमी तुमची आणि तिची बाजू घेणार ताई..., असं अरबाज म्हणतो. त्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकतो.