
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी रुग्णालयात धाव घेतली.

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद देखील बाबा सिद्दीकी यांनी मिटवले होते. दोन्ही अभिनेत्यांसोबत बाबा सिद्दीकी यांचे चांगले संबंध होतो.

दरवर्षी बाबा सिद्दीकी इफ्तार पार्टी आयोजित करायचे, त्यांच्या पर्टीमध्ये अनेक प्रसिद्ध, लोकप्रिय सेलिब्रिटी उपस्थित राहायचे.

अभिनेता संजय दत्त, शिल्पा शेट्टी, प्रिती झिंटा, इमरान हश्मी यांसारख्या इतर सेलिब्रिटींसोबत देखील बाबा सिद्दीकी यांचे चांगले संबंध होते.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या जीवाला देखील धोका असल्याचं सांगितलं जात. कारण सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध बिश्नोई गँगशी आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.