
'बालिका वधू' मालिकेने चाहत्यांचं जवळपास 7 वर्ष मनोरंजन केलं. 'बालिका वधू' मालिका 2008 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

'कुमकुम भाग्य' सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेने आतापर्यंत 2 हजार 565 एपिसोड शूट केले. मालिका 2014 मध्ये सुरु झाली होती.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. 2009 मध्ये सुरु झालेल्या मालिकेने तब्बल 4 हजार 325 एपिसोड पूर्ण केले. मालिकेमुळे अभिनेत्री हिना खान हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.

'भाभी जी घर पर है' मालिका 2015 मध्ये सुरु झाली होती. मालिकेचे जवळपास 2 हजार 235 एपिसोड शूट झाले. मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

सीआयडी मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालिका 1998 मध्ये सुरु झाली होती. अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.