AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Greenland : ‘होकार दिला तर ठीक अन्यथा…’ डोनाल्ड ट्रम्प संतापले, ग्रीनलँडला थेट धमकी

Greenland : WEF व्यासपीठावरून ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याची भूमिका मांडली. अमेरिकेशिवाय कोणताही देश किंवा देशांचा गट ग्रीनलँडचे संरक्षण करू शकत नाही असं ते म्हणाले.

Greenland : 'होकार दिला तर ठीक अन्यथा...' डोनाल्ड ट्रम्प संतापले, ग्रीनलँडला थेट धमकी
Trump and greenland newsImage Credit source: Google
| Updated on: Jan 21, 2026 | 10:54 PM
Share

गेल्या काही काळापासून ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून जागतिक स्तरावरील राजकारण तापले आहे. अमेरिकेने ग्रीनलँडवर कब्जा करण्याची तयारी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प कधीही हा देश ताब्यात घेऊ शकतात. अशातच आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडला उघड धमकी दिली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) वार्षिक बैठकीत बोलण्यासाठी ट्रम्प यांना 20 मिनिटे देण्यात आली होती, परंतु त्यांनी एक तासाहून अधिक वेळ भाषण दिले. WEF व्यासपीठावरून ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याची भूमिका मांडली. अमेरिकेशिवाय कोणताही देश किंवा देशांचा गट ग्रीनलँडचे संरक्षण करू शकत नाही असंही ते म्हणाले.

होकार दिला तर ठीक अन्यथा…

ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले की, ‘नाटो देश आता त्यांच्या सुरक्षेत पूर्वीपेक्षा जास्त गुंतवणूक करत आहेत. जर मी ठरवले तर मी अधिक शक्ती वापरू शकतो आणि कोणीही मला रोखू शकणार नाही, परंतु आम्ही ते करणार नाही. आमच्या मागण्या फार मोठ्या नाहीत. अमेरिकेला फक्त ग्रीनलँड नावाची जागा हवी आहे. आम्हाला हिंसाचार किंवा जबरदस्तीशिवाय हे करायचे आहे. मला शक्ती वापरायची नाही. जर तुम्ही हो म्हणाला तर ते कौतुकास्पद आहे; तुम्ही नाही म्हणू शकता आणि आम्ही ते लक्षात ठेवू’ असं म्हणत ट्रम्प यांनी धमकी दिली आहे.

डेन्मार्क कृतघ्न आहे : ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी डेन्मार्कला कृतघ्न म्हटले. ते म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धात डेन्मार्क जर्मनीकडून फक्त सहा तासांत हरला. ते स्वतःचे किंवा ग्रीनलँडचे रक्षण करू शकले नाही. त्यावेळी अमेरिकेने डेन्मार्क आणि ग्रीनलँडचे रक्षण केले होते, परंतु नंतर ग्रीनलँड डेन्मार्कला परत केले. आज डेन्मार्क अमेरिकेचे योगदान मान्य करत नाही, जे चुकीचे आहे. आम्ही ग्रीनलँड का मिळवू इच्छित आहे, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता यामागे कारण आहेत. तसेच ग्रीनलँडचे भौगोलिक स्थान देखील महत्त्वाचे आहे.

अमेरिका आनंदी असेल तर जग आनंदी – ट्रम्प

पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. जेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्था वेगाने वाढते तेव्हा संपूर्ण जगाला फायदा होतो. म्हणजे “जर अमेरिका आनंदी असेल तर जग आनंदी असेल.” पुढे बोलताना त्यांनी अमेरिकेच्या सत्तेच्या काळात व्हेनेझुएला आता अधिक पैसे कमवेल असंही विधान केले आहे.

Follow Us
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या नेत्याचा पराभव करत दणदणीत विजय
दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर
Nashik Gite Vs Darade Rada | दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही...