
बिग बॉस ओटीटी सध्या चाहत्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. यावेळी अनेक मोठ्या सेलेब्सनी शोमध्ये प्रवेश केला आहे. भोजपुरी राणी अक्षरा सिंह हिचाही या यादीत समावेश आहे.

अक्षरा घरात तिची बोलकी शैली सादर करत आहे. ती कोणत्याही मुद्यावर आपलं मत व्यक्त करण्यास मागे हटत नाही आणि चाहत्यांनाही ते आवडत आहे.

एवढंच नाही तर अक्षराची स्टाईल आणि घरातील फॅशन सेन्स देखील चाहत्यांना खूप आवडत आहे.

बिग बॉस ओटीटीच्या घरात अक्षरा दररोज वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसते. अक्षरा फॅशनमध्ये घरातल्या बाकी स्पर्धकांना मात देत आहे.

अक्षराच्या सौंदर्याची सध्या सर्वत्र होत आहे. चाहते घराच्या आतील तिच्या स्टाईचं कौतुक करत आहेत.

अक्षरा सिंह चक्क होस्ट करण जोहरसमोर बोलायला सुद्धा घाबरत नाही.