
बिग बॉसचे अनेक सीझन सलमान खान याने होस्ट केले आहे. बिग बॉस या शोची क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. पण विके एन्डका वारनंतर शोचा टीआरपी मोठ्या उंचीवर पोहोचतो कारण होस्ट सलमान असतो...

बिग बॉस शोच्या एका एपिसोडसाठी सलमान खान कोट्यवधी रुपये घेतो. रिपोर्टनुसार, शोच्या एका एपिसोडसाठी सलमान खान तब्बल 10 ते 12 कोटी रुपयांचा मानधन घेतो... सलमान खान एकाच दिवसात दोन एपिसोड शूट करतो...

'बिग बॉस 17' सीझनचे 2 एपिसोड सलमान खान याने शूट केले नाहीत. शोसाठी 14 दिवस अभिनेत्याने शूट केलं. या 14 दिवसांच्या शूटिंगमधून अभिनेत्याने कोट्यवधींची माया कमावली आहे.

रिपोर्टनुसार, सलमान खान याच्या 14 दिवसांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 14 दिवसांमध्ये जवळपास 140 ते 168 कोटी रुपयांचा कमाई केली आहे. पण यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सलमान याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.