
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोलने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

नुकताच काजोल 'दो पत्ती' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. नेटफ्लिक्सवर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

सिनेमाची चर्चा सुरु असताना काजोलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द काजोल हिने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'भडक आणि भयानक... ती मी आहे...' असं लिहिल आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केले आहे.

काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.