
बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर वाढदिवसानिमित्त दुबईला गेले आहेत. त्यांच्यासोबत त्याच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर देखील आहेत. यादरम्यान त्यांना दुबई सरकारने गोल्डन व्हिसा भेट दिला आहे.

बोनी कपूर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दुबई सरकारने गोल्डन व्हिसा दिला होता. यावेळी त्यांच्या दोन्ही मुली खुशी कपूर आणि जान्हवी कपूर या तिथे उपस्थित होत्या.

बोनी कपूर यांनी ट्विटरवर दोन फोटो शेअर करून दुबई सरकारचे आभार मानले आहेत. बोनी कपूर यांचा 11 नोव्हेंबरला वाढदिवस होता आणि ते आपल्या दोन मुलींसोबत दुबईमध्ये वाढदिवस साजरा करत होते.

बोनी कपूर यांची तिसरी मुलगी अंशुला कपूर आणि मुलगा अर्जुन कपूर काही कारणास्तव दुबईला पोहोचू शकले नाहीत.

काही दिवसांपूर्वीच जान्हवी आणि खुशी दुबईच्या वाळवंटात मस्ती करताना दिसल्या होत्या, त्यांनी सोशल मीडियावर काही फोटोही शेअर केले होते.