
समुद्र किनारा, पारंरिक लूक आणि खास फोटोशूट... अभिनेत्री अदिती हिच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

अदिती राव हैदरी हिने 'हीरामंडी' सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीची भूमिका आवडली. शिवाय अदितीच्या लूकने देखील चाहत्यांना घायाळ केलं आहे.

आता देखील अदिती हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये अदिती हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

अभिनेत्री कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असते. बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री अनेक सिनेमामध्ये काम केलं. पण तिला प्रसिद्धी मिळाली नाही.

अदिती तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली. पण अभिनेत्री सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करू शकली नाही. तिचे सिनेमे फ्लॉप ठरले.