
अभिनेत्री ईशा देओल हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचं फोटोशूट आवडलं आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. ईशा चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसत आहे.

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. पारंपरिक लूकमध्ये ईशाचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा देओल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. उद्योजक भरत तख्तानी सोबत ईशाचा घटस्फोट झाला आहे.

घटस्फोटानंतर अभिनेत्री दोन मुलींसोबत आयुष्य जगत आहे. खासगी आयुष्यावर अभिनेत्रीने अनेकदा वक्तव्य देखील केलं आहे.