
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं खूप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरच्या करिअरचा आलेख खूप वेगाने वाढत आहे आणि तिचे प्रचंड चाहते आहेत.

ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते आणि त्यांच्यासाठी तिचे फोटो शेअर करत असते. आता तिने तिच्या नव्या फोटोशूटमुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे.

या फोटोमध्ये जान्हवी कपूरने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. या टाईट ड्रेसमध्ये जान्हवीच्या फिगरची पुन्हा एकदा प्रशंसा होत आहे.

काही फोटोंमध्ये जान्हवी तिच्या केसांशी खेळताना पोज देत आहे, तिच्या चाहत्यांना तिची स्टाईल खूप आवडली आहे.

जान्हवीने या हॉट ड्रेससोबत हाय हिल्स कॅरी केल्या आहेत, ज्यामुळे तिचा लूक परफेक्ट दिसतो आहे. फोटोंमध्ये जान्हवीचा न्यूड मेकअप लूक तिचे सौंदर्य वाढवत आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.