
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत नुकतंच अंदमान निकोबारमधील सेल्युलर जेलमध्ये पोहोचली होती. हा तोच तुरुंग आहे जिथे वीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. कंगनाने तुरुंगातील तिचे फोटो शेअर केले आहेत. कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, “आज अंदमान निकोबारला पोहोचल्यानंतर सेल्युलर जेलमधील वीर सावरकरांच्या सेलला भेट दिली. या दरम्यान मी पूर्णपणे हादरले होते.

त्यांनी प्रत्येक क्रूरतेचा प्रतिकार केला. तेव्हा इंग्रज किती घाबरले असावेत, कारण त्यांनी त्या काळात वीर सावरकरांना काळ्या पाण्यात ठेवले होते.

समुद्राच्या मधोमध असलेल्या या छोट्याशा बेटातून पळून जाणे अशक्य आहे, तरीही इंग्रजांनी वीर सावरकरांना बेड्या ठोकल्या, जाड भिंतीचा तुरुंग बांधला आणि एका छोट्या कोठडीत त्यांना बंद केलं. कंगनाच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. सर्वजण कंगनाचे खूप कौतुक करत आहेत.
