
अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी खास चर्चेत असते. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमी सोशल मीडिया सेन्सेशन ठरतात. आता पुन्हा एकदा करिश्मा तन्नाने लाल रंगाच्या ब्लेझरमध्ये आपले फोटो शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

करिश्मा तन्ना हिने मालिकांशिवाय अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण मोठ्या पडद्यावर अभिनेत्री लोकप्रियता मिळू शकली नाही. पण सोशल मीडियावर अभिनेत्री कायम चर्चेत असते.

करिश्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

करिश्मा कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत असतात.

सास भी कभी बहू थी, नागिन आणि कयामत की रात यांसारख्या टीव्ही शोमध्ये करिश्मा तन्नाने घराघरातील प्रेक्षकांची छाप पाडली.