
बिग बॉसमध्ये येण्याआधी प्रत्येक स्पर्धकाचं मानधन ठरवलं जातं. त्यानूसार स्पर्धकांना दर एका एपिसोडचं मानधन मिळतं. तर बिग बॉसमध्ये आल्यानंतर स्पर्धकांच्या लोकप्रियेत देखील मोठी वाढ होते... सध्या अंकिता लोखंडे आणि मन्नारा हिच्या मानधनाची चर्चा रंगली आहे.

'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे अंकिता घरा-घरात पोहोचली आहे. अभिनेत्रीला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. बिग बॉसमध्ये अंकिता हिला एका एपिसोडसाठी 1.7 लाख रुपये मानधन मिळतं.

अंकिता हिच्या एका आठवड्याच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री प्रत्येक आठवड्याला जवळपास 12 लाख रुपये कमवते. म्हणजे बिग बॉसच्या शेवटच्या दिवसापर्यंत अभिनेत्रीने 1.8 कोटी रुपये कमवले आहेत. ही रक्कम बिग बॉसच्या प्राईज मनीपेक्षा जास्त आहे.

पण अभिनेत्री मन्नारा चोप्रा हिची कमाई अंकिता हिच्यापोक्षा अधिक आहे. मन्नारा हिला आठवड्याला 15 लाख रुपये म्हणजे बिग बॉसच्या शेवटच्या दिवसापर्यंत अभिनेत्रीने 2.2 कोटी रुपये कमवले आहेत. ही रक्कम बिग बॉसच्या प्राईज मनीपेक्षा जास्त आहे.

मन्नारा हिचं मानधन अंकिता लोखंडे हिच्यापेक्षा फक्त अधिक नाही तर, बिग बॉसच्या प्राईज मनीपेक्षा 40 ते 50 लाख रुपये जास्त आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बॉसची चर्चा रंगली आहे.