
हिंदी सिनेसृष्टीत सध्या कैक अभिनेत्री काम करतात. पण त्यातही काही चेहरे हे उठून दिसतात. त्यांचं काम लक्षात राहातं. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री सध्या हिंदी सिनेसृष्टी गाजवते आहे.

अभिनेत्री गिरीजा ओक- गोडबोले... गिरीजा मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही काम करते. तिच्या कामाचं प्रचंड कौतुक होतं.

अभिनेत्री गिरीजा ओक- गोडबोले हिने काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांआधी शाहरूख खानचा 'जवान' हा सिनेमा आला होता. या सिनेमात तिने काम केलं आहे. 'तारे जमीन पर' या सिनेमात आमीर खानसोबत झळकली होती.

सिनेमांमध्ये गिरीजा काम करतेच... तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. हिंदी- मराठी जाहिरातींमध्ये गिरीजा दिसली आहे. जाहिरात क्षेत्रात तिचं मोठं नाव आहे.

गिरीजा ओक ही संवेदनशील अभिनेत्री असल्याचं सिनेसृष्टीत बोललं जातं. तिच्या कामाचंही प्रचंड कौतुक होतं. ठकीशी संवाद हे तिचं नवंकोरं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तिच्या या नाटकातील भूमिकेचंही कौतुक केलं जात आहे.