
'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सिझन गाजतोय तो स्पर्धकांच्या वेगळपणामुळे... या सिझन ग्रॅन्ड फिनाले जवळ आला आहे. 6 ऑक्टोबरला फिनाले होणार आहे. या वेळची 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी कोण जिंकतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकरदेखील 'बिग बॉस मराठी'च्या या सिझनमध्ये आहे. घरातील तिचा वावर आणि गेम तिच्या चाहत्यांना भावतो आहे.

अंकिता 'बिग बॉस मराठी'च्या घरात तिच्या स्टॅटर्जीने खेळतेय. प्रेक्षकांचाही तिला पाठिंबा मिळतो आहे. अंकिताच्या जवळच्या मित्रांनी अंकितासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

'बिग बॉस मराठी' 2024 जिंकून येअंकिता... आणि जिंकून आलीस की पुन्हा एकदा देवबाग ट्रिप फिक्स... खूप प्रेम..., अशी पोस्ट कंटेन्ट क्रिएटर नेहा कुलकर्णीने लिहिली आहे.

नेटकऱ्यांनी कमेंट करत अंकिताला पाठिंबा दिला आहे. कोकणची माणसं साधी भोळी हे खरंच आहे... अंकिताच्या बाबांनी काल रडवलं.. किती सुंदर माणसं आहेत ही माणसं. अंकिताच 'बिग बॉस मराठी' जिंकणार, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.