
लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये नोरा फतेही प्रचंड रॉयल आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

नोराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने म्यूझिक एल्बमपासून सिनेमांपर्यंत स्वतःची जादू दाखवली आहे. ‘नाच मेरी रानी’, ‘गर्मी’, 'कुसू कुसू' यांसारख्या अनेक गाण्यांमुळे नोरा कायम चर्चेत असते.

सांगायचं झालं तर, ‘दिलबर’ गाण्यावर भन्नाट डान्स केल्यानंतर नोरा हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये तुफान वाढ झाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

चाहते कायम नोराच्या डान्सचं कौतुक करताना दिसतात. नोरा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. नोरा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नोरा फक्त तिच्या प्रोफशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.