
करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

'सैराट'नंतर रिंकूच्या लूकमध्ये बराच बदल झाला असून भूमिकेच्या गरजेनुसार ती तिच्या शरीरयष्टीत आणि लूकमध्ये बदल करताना दिसतेय.

नुकतेच तिने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अगदी साध्या लूकमध्येही रिंकूचं सौंदर्य विशेष लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी तिच्या फोटोंवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तुझे हे फोटो पाहून स्मिता पाटीलची आठवण आली, असंही एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे.

रिंकूच्या या फोटोंवर अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक यांनीसुद्धा कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.

रिंकू लवकरच 'झुंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.