
किंग खान म्हणजे शाहरुख खान याची लेक आणि अभिनेत्री सुहाना खान हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

लाल साडीत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सुहाना, शाहरुख खान याची लेक असल्यामुळे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सुहाना खान फक्त तिच्या सिनेमांमुळे आणि स्टारकिड असल्यामुळे चर्चेत नसते. तर सुहाना तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

सुहान खान हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 'किंग' सिनेमात सुहाना पहिल्यांदा वडील शाहरुख खान सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.