
'द आर्चीज' सिनेमा महिन्याच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. सिनेमा वेदांग याने रेगीची भूमिका साकारली होती तर खुशी बेट्टीच्या भूमिकेत दिसली. सध्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

वेदांग याने खुशी सोबत खास नातं आहे... असं कबूल केलं आहे. पण दोघं एकमेकांना डेट करत नाहीत... असं वक्तव्य देखील वेदांग याने केलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत वेदांग याने मोठं वक्तव्य केलं आहे.

वेदांग म्हणाला, 'खुशी आणि मी अनेक गोष्टींमुळे एकत्र आहोत. संगीतात आम्हाला प्रचंड रस आहे. खुशी आणि मी एकमेकांना डेट करत नाही. पण आमच्यामध्ये एक खास बॉन्ड आहे. अनेक गोष्टींमुळे आम्ही एकत्र आहोत...'

पुढे वेदांग म्हणाला, 'मी सध्या सिंगल आहे आणि जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा नक्कीच परिस्थिती वेगळी असेल...' असं देखील वेदांग म्हणाला. गेल्या अनेक दिवसांपासून खुशी आणि वेदांग त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत.

खुशी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. खुशी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.