
अभिनेत्री पलक तिवारी हिने 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

पहिल्या सिनेमात झळकल्यानंतर चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलकच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

आता पलक हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

साडीत पलक हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा साडीतील हटके लूक प्रचंड आवडला आहे. सोशल मीडियावर पलक कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.