
अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रही हिचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रही 'मर्डर 2', 'रेड' आणि 'इश्क वाला लव्ह'मध्ये दिसली आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

सुलग्नाचा जन्म 1987 मध्ये ओडिशामध्ये झाला. अभिनेत्रीने 2007 मध्ये 'अंबरधारा'मधून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर ती 'दो सहेलियां' आणि 'बिदाई' सारख्या मालिकांमध्ये दिसली आहे.

सुलग्नाने 2011 मध्ये 'मर्डर 2' या थ्रिलर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ही अभिनेत्री अजय देवगणच्या 'रेड' चित्रपटात दिसली होती. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त सुलग्नाने मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहते कमेंट करतात.

अभिनेत्रीने प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन बिस्वा कल्याण रथसोबत लग्न केले.