
सध्या मुंबई, कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यात तर लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. मुंबईतही रस्ते पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. हीच बाब लक्षात घेताना अनेक जिल्ह्यांत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढच्या 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने येथील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर आता गावखेड्यातील शाळांचं काय होणार? या शाळा चालूच राहणार का? असे विचारले जात आहे.

पालक, विद्यार्थ्यांत पसरलेल्या याच संभ्रमामाबत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे पाकल तसेच विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी सुट्टीबाबत निर्णय घ्यावा, असे भुसे यांनी सांगितले आहे.

स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी तसेच वेळप्रसंगी मुख्याध्यापकांनी शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे दादा भुसे यांनी सांगितले आहे. आगामी काळात पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, असे भुसे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सध्या पालघर जिल्हा, ठाणे पालिका हद्द, कल्याण डोंबिवली पालिका हद्द, मुंबई, मीरा-भाईंदर पालिका हद्दीतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.