PHOTO | देशात कोणत्या राज्यात कधी शाळा सुरु होणार?; जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Nov 12, 2020 | 8:42 PM
1 / 8
महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. आता थेट दिवाळीनंतरच राज्यात शाळा-महाविद्यालये सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसे सूतोवाच केलं आहे. देशातील कोणत्या राज्यात कधी शाळा सुरु होणार हे सविस्तर जाणून घेऊया.

2 / 8
15 ऑक्टोबरनंतर देशातील शाळा महाविद्यालये सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. पण अनेक राज्यांनी दिवाळीनंतर महाविद्यालये सुरु करणार असं सांगितलं आहे. त्यानुसार अनेक राज्यांत नियमावलीसुद्धा जाहीर केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यांत शाळा- महाविद्यालये सुरु झाली आहेत. महाराष्ट्रात शाळा शिफ्ट नुसार सुरु होणार आहेत.

3 / 8
 दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेता दिल्ली सरकारने आगामी आदेशापर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवले आहेत. दिल्ली सरकारने सांगितलं आहे, की विद्यार्थी, पालक, डॉक्टर्स यांच्याकडून सूचना घेतल्यानंतरच शाळा सुरु करण्यात येतील. त्यासाठी नियमावली जाहीर केली जाईल.

4 / 8
आसाममध्ये 2 नोव्हेंबरपासून इयत्ता 6 वी ते 12 वी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत यायला परवानगी देण्यात आली आहे. आसामने यासाठी ऑड-ईव्हन पद्धत लागू केली आहे. इयत्ता 6 वी, 8 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी शाळेत येता येईल. तर इयत्ता 7 वी, 9 वी, 11 वीच्या विद्यार्थ्यांना बाकीचे तीन दिवस शाळेत येण्यास मुभा आहे.

5 / 8
Student

Student

6 / 8
गोवा राज्यात 21 नोव्हेंबरपासून 10 वी आणि 12 वीच्या शाळा सुरु होणार आहेत. त्यासाठी लवकरच गोवा सरकारतर्फे नियमवाली जाहीर केली जाणार आहे.

7 / 8
हरियाणा राज्यात 16 नोव्हेंबरपासून शाळा-महाविद्यालये सुरु होणार आहेत.  राज्य सरकारने त्यासाठी नियमावली तयार केली आहे.

8 / 8
पश्चिम बंगालमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश आहेत.  30 नोव्हेंबरपर्यंत कोरोना संक्रमण आटोक्यात आल्यानंतर, सर्व चाचपणी करुन  1 डिसेंबरनंतर पश्चिम बंगालमधील शाळा सुरु होऊ शकतात.