
यूट्यूबर ध्रुव राठी याच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान ध्रवने व्हिडीओ करत स्वतःचं मत मांडलं.

व्हिडीओमध्ये ध्रुव याने पाकिस्तानचा दहशतवादी राष्ट्र म्हणून उल्लेख केला. ज्यामुळे ध्रुवला पाकिस्तानात बॉयकॉट करण्यात आलं आहे.

2013 मध्ये सुरू झालेला त्याचा युट्यूब प्रवास आज 28 दशलक्ष सबस्क्राइबरपर्यंत पोहोचला आहे. त्याच्या व्हिडिओंमध्ये सोप्या भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगण्याच्या त्याच्या कलेमुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला आहे.

ध्रुवने नेटफ्लिक्स इंडिया आणि ड्यूश वेले सारख्या प्लॅटफॉर्मवरही काम केलं आहे. ध्रुवची YouTube वरून मासिक कमाई 12 - 15 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे आणि वार्षिक कमाई 7.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

याशिवाय, ब्रँड स्पॉन्सरशिप, एफिलिएट मार्केटिंग आणि सार्वजनिक भाषणातूनही त्याचं उत्पन्न दिवसागणिक वाढच आहे. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 24- 58 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.