शूटिंगच्या वेळी कट बोलायला विसारला दिग्दर्शक, संजय दत्त नको ते करुन बसला
एका बॉलिवूड चित्रपटाच्या सेटवरील एका सीनने संपूर्ण टीमला हादरवून सोडलं होतं. सेटवर मोठी खळबळ माजली होती. शूटिंगवेळी संजय दत्तने अचानक जे केलं ते पाहून सर्वजण हादरले. याचा स्क्रिप्टमध्ये देखील नव्हता उल्लेख.

१९९३ मध्ये प्रदर्शित झालेला 'खलनायक' हा चित्रपट बॉलिवूडमधील एक मैलाचा दगड मानला जातो. नुकताच २४ एप्रिल २०२६ रोजी या चित्रपटाच्या सीक्वेलचा म्हणजेच 'खलनायक रिटर्न्स'चा टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या निमित्ताने मूळ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक थक्क करणारा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिग्दर्शक सुभाष घई यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, संजय दत्तने साकारलेले 'बल्लू' हे पात्र अत्यंत अनपेक्षित आणि हिंसक प्रवृत्तीचे होते, जे पडद्यावर जिवंत करण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर एक अशी घटना घडली ज्याने उपस्थित सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. एका दृश्यात संजय दत्तला त्याच्या सहकलाकाराशी केवळ संवाद साधायचा होता, मात्र सीन सुरू असताना अचानक त्याने समोरच्या व्यक्तीचा गळा आवळायला सुरुवात केली.

हा प्रकार मूळ पटकथेचा भाग नव्हता आणि संजयची पकड घट्ट होत गेल्याने सेटवर एकच खळबळ उडाली. क्रू मेंबर्सना वाटले की काहीतरी गंभीर घडत आहे आणि शूटिंग थांबवावे लागेल, परंतु सुभाष घई यांनी 'कट' न म्हणता कॅमेरे सुरूच ठेवले. त्यांना त्या पात्रातील तो नैसर्गिक हिंसक बदल कॅमेऱ्यात कैद करायचा होता, ज्यामुळे तो सीन अत्यंत वास्तववादी वाटला.

या व्यतिरिक्त, सुभाष घई यांनी चित्रपटातील गाजलेल्या 'चोली के पीछे क्या है' या गाण्याबाबतही एक रंजक खुलासा केला. त्यांनी शेवटच्या क्षणी संजय दत्तला या गाण्यात डोळ्यांवर पट्टी बांधायला लावली होती, कारण संजयच्या डोळ्यांतील राग आणि निरागसता यांचे मिश्रण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते.

अनेक वादांना आणि विरोधाला तोंड देऊनही 'खलनायक' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि आजही तो एक क्लासिक म्हणून ओळखला जातो. आता 'खलनायक रिटर्न्स'च्या टीझरमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा बल्लूची जादू पाहण्यासाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.