
आपण टोमॅटो भाज्यांसोबत शिजवून खातो. मात्र कच्चा टोमॅटो खाणे आरोग्यासाठी चांगले असते. टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी, अँटीऑक्सिडंट्स सारखे घटक शिजवल्याने नष्ट होतात. त्यामुळे टोमॅटो कच्चे खाणे अधिक फायदेशीर ठरते.

काकडीमध्ये 95 % पाणी असते. यामुळे शरीर हायड्रेटेड आणि डिटॉक्सिफाय राहते. त्यामुळे काकडी नेहमी कच्ची खा. काकडीच्या सालीमध्येही भरपूर फायबर असते, त्यामुळे काकडी सालासह खाण्याचाही सल्ला दिला जातो.

कच्च्या बीटामध्ये नायट्रेट, फायबर आणि पोटॅशियम सारखे घटक आढळतात. मात्र बीट शिजवल्यास यातील घटक कमी होतात. त्यामुळे बीट कच्चे खावे, हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

कच्चा कांदा खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायेशीर आहे. कांदा शिजवल्याने त्यात असलेले क्वेर्सेटिन नावाचे अँटीऑक्सिडंट नष्ट होते. त्यामुळे कांदा कच्चा खाण्याचा सल्ला दिला जातो.

ब्रोकलीही कच्ची खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यातील 90 % पोषक घटक शिजवल्याने नष्ट होतात. ब्रोकलीमध्ये सल्फोराफेन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, ज्यामुळे कर्करोग बरा होतो, त्यामुळे ब्रोकली कच्ची खाण्याचा सल्ला दिला जातो.