
आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार प्रत्येकाने ब्रेकफास्टला पोष्टिक आणि पोषक अन्नच खाल्ले पाहिजे. अनेकजण सकाळी नाश्ता करताना व्हाईट ब्रेड खातात. पण हाच व्हाईट ब्रेट शरीरासाठी फार घातक ठरू शकतो.

तुम्ही रोज व्हाईट ब्रेट खाल्ले तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. व्हाईट ब्रेडमुळे तुम्हाला स्ट्रेसची समस्या निर्माण होऊ शकते.

रोज व्हाईट ब्रेड खाल्ल्याने तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे रोज नाश्त्यामध्ये व्हाईट ब्रेड खाताना विचार करायला हवा.

रोज व्हाईट ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. कारण व्हाईट ब्रेडचा ग्लायसेमिक इंडेक्स फार जास्त असतो. त्यामुळेच शरीरातील साखर वाढण्याचा धोका निर्माण होतो.

नाश्ता करताना रोज व्हाईट ब्रेड खाल्लाने त्याचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होऊ शकतो. रोज व्हाईट ब्रेड खाल्ल्याने तुम्हाला अॅसिडिटीचाही त्रास होऊ शकतो.

रोज व्हाईट ब्रेड खाल्ल्याने तुमचे वजनही वाढू शकते. त्यामुळेच व्हाईट ब्रेड प्रमाणापेक्षा अधिक खाऊ नये, असा सल्ला दिला जातो.

रोज व्हाईट ब्रेड खाण्याची सवय असेल तर त्याऐवजी तुम्ही स्प्राऊडेट ग्रेन बेड खाऊ शकता. या ब्रेडमध्ये प्रोटीन, फायबर तसेच अन्य जिवनसत्त्वे असतात. (सूचना- या लेखात दिलेली माहिती ही प्रातिनिधिक स्वरुपाची आहे. इंटरनेटवर आधारलेल्या माहितीवर हा लेख लिहिलेला आहे. तरी या लेखात दिलेल्या माहितीची अंमलबजावणी करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)