
राफेल : राफेल जगातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे फायटर जेट मानले जाते. फ्रान्स,भारत आणि इजिप्तच्या सैन्यात ते समाविष्ट आहे. एका राफेलची किंमत 135 मिलियन डॉलर आहे. भारताने फ्रान्सकडून 36 राफेल खरेदी केलेत. इजिप्तने 54 आणि कतारने 36 फायटर खरेदी केलेली आहेत. यूएईने 80 राफेल खरीदसाठी 19 अब्ज डॉलरची तगडी डील केली होती.

यूरोफायटर टायफून : 4.5 जनरेशनचे हे फायटर जेट यूके, जर्मनी, इटली आणि स्पेन यांनी एकत्र येऊन तयार केले आहे. टायफूनला डॉगफायटिंगसाठी सर्वात चांगले म्हटले जाते. याचा थर्स्ट टू वेट रेषो 1:1 असा आहे. याची एक्सपोर्ट प्राईस 117 मिलियन डॉलर आहे. प्रोजेक्टमध्ये सामील देशांसाठी ती 50 मिलियन डॉलर पर यूनिट आहे. या फायटरमध्ये अनेक ग्राऊंडब्रेकिंग टेक्नोलॉजीचा वापर प्रथमच केला आहे.

सुखोई-35 - हे रशियाचे सर्वात प्रगत 4.5 जनरेशन फायटर जेट आहे. याची किंमत 85 मिलियन डॉलर आहे.रशिया आणि चीनकडेही हे विमान आहे. रशिया आणि चीनकडे एफ-22 आणि एफ-35 सारखी स्टेल्थ फायटर नाही. परंतू वेग आणि एजिलिटीत सुखोई-35 ला तोड नाही. याचा वेग 1900 नॉटिकल मैल इतका प्रचंड आहे.

शेनयांग जे-35 - चीनच्या या जेट फायटर विमानाची किंमत 70 मिलियन डॉलर प्रति यूनिट आहे.या विमानाला अमेरिकेच्या एफ-35 लायटनिंग II ला उत्तर असल्याचा चीनचा दावा आहे.चीन जगभर याची मार्केटिंग करीत आहे.याचा स्पीड 1.8 मॅक आणि वेग 1800 नॉटिकल मैल आहे.

साब जेएएस ग्रिपेन - या जेट फायटरला स्वीडनने विकसित केले आहे. स्वीडनसह ब्राझील, साऊथ आफ्रीका आणि हंगेरीची वायू सेना या विमानांचा वापर करते.याची किंमत प्रति यूनिट 85 मिलियन डॉलर आहे.यात एडवांस्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम असल्याने ते स्मार्ट फायटर म्हटले जाते.

एफ-15 ईएक्स ईगल II - हे एफ -15 ची सर्वात प्रगत आवृत्ती आहे. एका युनिटची किंमत 95 मिलियन डॉलर आहे. हे विमान ध्वनीच्या 2.5 पट वेगाने उडते. 16 मिसाईलच्या सोबत 13.6 टन शस्रास्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. अमेरिकेने अशा केवळ 8 फायटरची निर्मिती केली आहे.एकदा इंधन भरले की 2,100 नॉटिकल मैलापर्यंत उडू शकते.

एफ-35 लायटनिंग II - एफ-35ला जगातील सर्वात महागडे वेपन सिस्टम मानले जाते. याचे अनेक वेरिएंट आहेत. एफ-35 लायटनिंग II ची किंमत सुमारे 109 मिलियन डॉलर आहे. अमेरिकेन वायू सेना 2006 पासून एफ-35 विमानांचा वापर करत आली आहे. आतापर्यंत 1,100 हून अशी विमाने तयार झाली आहेत.

चेंगडू जे-20 -हे चीनचे पहीले स्टील्थ फायटर जेट आहे. याची किंमत 110 मिलियन डॉलर आहे.आवाजाच्या दुप्पट वेगाने उडते. एकावेळी 3000 नॉटिकल मैलपर्यंत उड्डाण करु शकते.चीन याचा वापर साऊथ चायना सी मध्ये वर्चस्वसाठी करतो.हे जेट अमेरिकेच्या एफ-22ला टक्कर म्हटले जाते. चीनने याची टेक्नोलॉजी स्वत:जवळ राखून ठेवली आहे.

एफ-22 रॅप्टर : एफ-22 रॅप्टरला जगातील सर्वात महागडे बेस्ट फायटर मानले जाते.याची किंमत सुमारे 143 मिलियन डॉलर आहे. भारतीय रुपयांत याची किंमत 12 अब्ज इतकी आहे.या किंमतीत भारतात एम्स हॉस्पिटलची उभारणी होऊ शकते.

सुपर हॉर्नेट - सुपर हॉर्नेट एअर टू एअर आणि एअर टू ग्राऊंड कॉम्बॅटमध्ये हे जेट फायटर माहिर आहे. याची किंमत सुमारे 73 मिलियन डॉलर आहे. याची निर्मिती अमेरिकेची बोईंग कंपनी करते. अमेरिकेसह हे ऑस्ट्रेलिया आणि कुवैत वायू सेनाही याचा वापर करते. आतापर्यंत 630 जास्त सुपर हॉर्नेटची निर्मिती झाली आहे. याची रेंज 1800 नॉटिकल मैल आहे. ध्वनीच्या गतीहून अधिक वेगाने ते उड्डाण घेते.