
बॉलिवूडची डान्स टिचर म्हणून फराह खान चर्चेत असते. फराह खान हिचा कुक दिलीप हा देखील सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो आता फक्त कुक राहिला नाही तर तो फेसम सेलिब्रिटी बनला आहे.

फराह खानच्या चॅनलवर तिच्यापेक्षा अधिक दिलीप हा दिसतो. फराह खान दिलीपची जोडी लोकांना चांगलीच आवडताना दिसत आहे.

जवळपास सर्व मोठ्या कलाकारांच्या घरी दिलीप फराह खानसोबत गेलाय. आता सर्वांना प्रश्न पडतो की, दिलीपची महिन्याची कमाई किती आहे?

दिलीप बिहारच्या एका छोट्या खेड्यातील असून मुंबईमध्ये कामाच्या शोधात आला होता. तो फराह खानकडे मागील दहावर्षांपासून काम करतो. महिन्याभराला दिलीप एक लाखांची कमाई करतो.

यासोबतच त्याच्या मूळगावी तो सहा खोल्यांचा बंगाला देखील बांधतोय. मध्यंतरी दिलीपला एका जाहिरातीमध्येही काम करण्याची संधी मिळाली होती.