
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफनंतर भारतातील व्यापारावर परिणाम झालेला आहे. हा आर्थिक फटका बसू नये म्हणून अमेरिकेने हा टॅरिफ कमी करावी, अशी भारताची भूमिका आहे. मात्र रशियाची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांनी अद्याप हा टॅरिफ कमी केलेला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या ट्रम्प यांनी भारतासंदर्भात अडेलतट्टूची भूमिका घेतली असली तरी भारतासाठी मात्र एक मोठी खुशखबर आलेली आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केलाला असला तरी भारताच्या गंगाजळीत परकीय चलनसाठा वाढला आहे.

गेल्या काही दिवसांत भारताच्या जीडीपीत वाढ झाल आहे. तसेच भारताने जीएसटी या करप्रणालीत काही महत्त्वाचे बदल केल्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आता भारताच्या तिजोरीत परकीय चलनसाठा वाढला आहे.

सलग तिसऱ्या आठवड्यात भारताच्या तिजोरीतील परकीय चलनसाठ्यात वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या ताज्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार 12 सप्टेंबर रोजी तिसरा आठवडा संपला आहे. या आठवड्यात परकीय चलनसाठा 4.698 अब्ज डॉलर्सची लक्षणीय वाढ झाली आहे.

आता भारताच्या तिजोरीत परकीय चलनसाठी तब्बल 702.996 अब्ज डॉलर्स झाला आहे. हा चलनसाठा 705 अब्ज डॉलर्स या सार्वकालिक उच्चांकाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे भारताला काही प्रमाणात फटका बसलेला असला तरी भारताची परकीय गंगाजळी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

भारताच्या गंगाजळीत परकीय चलनसाठ्यात इनेक घटकांचा समावेश होतो. या चलनसाठ्यातील फॉरेन करेन्सी असेट्समध्ये (FCA) सर्वाधिक वाढ झाली असून हा साठा 587.014 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.

भारताच्या गोल्ड रिझर्व्हमध्येही (सोन्याचा साठा) वाढ झाली आहे. ही वाढ 2.12 अब्ज डॉलर्स एवढी आहे. आता गोल्ड रिझर्व्ह 92.419 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.