
उत्तरेकडील राज्यांत करवा चौथ सणाचे खूप महत्व आहे. हा सण प्रेमाचे आणि पती-पत्नीमधील अतूट बंधनाचे प्रतीक बनला आहे. बॉलिवूड आणि टीव्हीमध्ये अशा अनेक मुस्लिम अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या हिंदू पतींच्या दीर्घायुष्यासाठी भक्ती आणि थाटामाटात हे व्रत ठेवून त्या उपवास करतात. त्यांच्या पतीच्या संस्कृतीचा आदर करून, या अभिनेत्रींनी हे सिद्ध केलं आहे की प्रेमापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही.

बॉलिवूड सुपरस्टार कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलशी लग्न केले तेव्हा सर्वांचे लक्ष त्यांच्या पहिल्या करवा चौथकडे लागले. कतरिनाने केवळ तिच्या पतीसाठी उपवास केला नाही तर विकीनेही आपल्या पत्नीला सपोर्ट करण्यासाठी उपवास पाळला.

बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केल्यानंतर दिया मिर्झाने आनंदाने करवा चौथची परंपरा स्वीकारली. तिच्या पतीच्या संस्कृतीचा आदर म्हणून, दिया दरवर्षी हे व्रत मोठ्या उत्साहात साजरा करते.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सोहा अली खान हिचे लग्न अभिनेता कुणाल खेमूशी झाले आहे. सोहा तिच्या पतीसाठी करवा चौथचा उपवास देखील पाळते. पती-पत्नी दोघेही एकमेकांचे सण मोठ्या आदराने साजरे करतात.

टीव्हीवरील "कशिश" या मालिकेतील अभिनेत्री म्हणजेच आमना शरीफ हिचं लग्न निर्माते अमित कपूरशी झालं आहे. आमना दरवर्षी करवा चौथ मोठ्या थाटामाटात साजरी करते. तिचा पारंपारिक अवतार, तिचा उपवास सर्व गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतात.

अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त (खरं नाव: दिलनवाज शेख) देखील मुस्लिम आहे. पण मान्यता दरवर्षी संजू बाबासाठी करवा चौथचा उपवास करते. तिचा उपवास बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असतो. ती अनेक करवा चौथ पार्ट्यांमध्येही दिसते.