
अभिनेत्री अमीषा पटेल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आज देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अमीषा सध्या तिच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत आली आहे.

अमीषा मुंबई एका आलिशान घरात राहते... अनेक महागड्या वस्तूंनी अमीषा हिने स्वतःचं घर सजवलं आहे. बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी अमीषा आज रॉयल आयुष्य जगत आहे.

अमीषा हिच्या घराचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संपूर्ण घर अभिनेत्रीने स्वतःच्या फोटोंनी सजवलं आहे. अमीषाच्या घराचा प्रत्येक कोपरा प्रचंड आलिशान आहे. तिच्या घराती किंमत देखील कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

अमीषा हिच्या घरात बॅग्स आणि फुटवियर ठेवण्यासाठी एक वेगळी जागा आहे. बॅग आणि चपलांवर अधिक पैसे खर्च केले नसते तर अभिनेत्रीकडे आज स्वतःचं आणखी एक घर असतं... असं खुद्द अमीषा म्हणाली.

अमीषा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.